गरे खाऊन बिया फेकू नका, त्यांची भाजी मटणापेक्षा लागते भारी! डायबिटीजवर रामबाण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आहारात फळांचा समावेश असायलाच हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. विशेषतः हंगामी फळं खाणं आरोग्यासाठी उपयुक्त असतं. काही फळांचा फक्त गर आणि रसच नाही, तर बीसुद्धा फायदेशीर असते. या बियांमुळे आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ राहू शकतं. (सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी)
advertisement
गऱ्यांच्या बियांची भाजी एवढी स्वादिष्ट लागते की तिच्यासमोर पनीर आणि मटणही फिके पडतील. त्यामुळे अनेकजण अगदी बोटं चाटत ही भाजी खातात. आयुर्वेदिक डॉक्टर प्रियंका सिंह सांगतात की, गऱ्यांच्या बिया पचनसंस्था, हाडांबाबत समस्या, शरिरातली रक्ताची कमतरता, तणाव, ब्लड शुगर इत्यादींवर उपयुक्त असतात. शिवाय या बियांमुळे शरिराला ऊर्जाही मिळते.
advertisement
advertisement
advertisement