Wheat Allergy : गहू सर्वांसाठी सुरक्षित नाही! गव्हाचे पीठ खाल्ल्यानंतर त्रास का होतो? डॉक्टरांचा महत्त्वाचा इशारा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Can Wheat Flour Cause Illness : गहूचे पीठ खाल्ल्याने काही वेळा लोकांना त्रास जाणवू शकतो. हे प्रामुख्याने सिलीअॅक डिसीज, ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी किंवा गव्हाची अॅलर्जी यांमुळे होते. अशा समस्यांनी ग्रस्त लोकांनी गव्हाचे पीठ किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास खाज येणे, उलटी, सूज येणे अशा विविध तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
अनेक बिस्किटे आणि बेकरी उत्पादनेही गव्हाच्या पिठापासून बनवली जातात. मात्र, काही लोकांसाठी गव्हाचे पीठ हानिकारक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? गव्हाचे पीठ खाल्ल्यानंतर काही लोकांना पोटदुखी, गॅस, थकवा किंवा वारंवार आजारी पडण्याच्या तक्रारी होतात. अशा वेळी गव्हाचे पीठ खाल्ल्यानंतर त्रास का होतो आणि कोणी विशेष काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे.
advertisement
नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांनी News18 ला सांगितले की सिलीअॅक डिसीज ही गव्हाशी संबंधित सर्वात सामान्य समस्या आहे. हा एक ऑटोइम्यून आजार असून यात शरीर गव्हामध्ये असलेल्या ग्लूटेन प्रोटीनचे पचन करू शकत नाही. सिलीअॅक डिसीज असलेली व्यक्ती गहू किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ खाताच लहान आतड्यांना नुकसान होते, त्यामुळे पोषक घटक नीट शोषले जात नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
याशिवाय, काही लोकांना गव्हाची अ‍ॅलर्जीही असू शकते आणि ती विशेषतः मुलांमध्ये अधिक दिसून येते. गहू खाल्ल्यानंतर लगेचच खाज सुटणे, पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये ही अ‍ॅलर्जी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे वेळेत ओळख करून डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की गव्हाचे पीठ प्रत्येकासाठी हानिकारक नसते; मात्र ते खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य आहार पद्धती स्वीकारणे गरजेचे आहे. योग्य वेळी ओळख झाल्यास सिलीअॅक, ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी किंवा गहू अ‍ॅलर्जी यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते आणि निरोगी आयुष्य जगता येते. गव्हाशिवाय इतर अनेक पदार्थांच्या मदतीने तुम्ही हेल्दी आणि फिट राहू शकता.







