बांबूचा मुरंबा खाल्लाय कधी? रेसिपी सोपी, चव आणि फायदे दोन्ही लय भारी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
कोरोना आयुष्यात आल्यापासून आरोग्याची किती काळजी घ्यायला हवी, याबाबत आपण अगदी खडबडून जागे झालो. आजकाल अनेकजण प्रत्येक पदार्थात चवीसोबतच आरोग्यदायी फायदेही पाहतात. एकूणच फिटनेसकडे आता आधीपेक्षा जास्त लक्ष दिलं जातं. कोणत्या पदार्थातून सर्वाधिक पौष्टिक तत्त्व मिळतील हे पाहिलं जातं. असाच एक पदार्थ म्हणजे बांबूचा मुरंबा. तुम्ही कधी हा मुरंबा खाल्लाय का? बांबू खाणं हे जरा विचित्र वाटत असलं, तरी विविध भागांमध्ये बांबू शूट या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात आणि ते आरोग्यदायीही असतात. (रजत भट्ट, प्रतिनिधी / गोरखपूर)
बांबू शूटचा मुरंबा बनवण्यासाठी सर्वात आधी बांबूची साल व्यवस्थित काढून घ्यावी. मग बांबूचे पातळ तुकडे करून ते स्वच्छ होण्यासाठी 3 दिवस पाण्यात भिजवत ठेवावे. 3 दिवस बांबू पाण्यात व्यवस्थित भिजल्यानंतर 1 दिवस जाऊ द्यावा. मग साखरेचा एकतारी पाक बनवून त्यात हे बांबू बुडवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्यात चवीनुसार मध घालावं.
advertisement
advertisement
advertisement
बांबू शूटमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात. शिवाय यात फॅटचं प्रमाणही खूप कमी असतं. म्हणूनच नुसता बांबू शूट खाण्यापेक्षा त्याचा मुरंबा बनवून लोक आवडीने खातात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत, आहाराबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.