Womens Facial Hairs : महिलांच्या चेहऱ्यावर का येतात दाढी-मिशा? कोणत्या होर्मोन्समुळे येऊ लागतात केस, वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा महिला या समस्येमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात किंवा लोकांच्या टोमण्यांना घाबरून गप्प राहतात. पण ही परिस्थिती का ओढवते आणि त्यामागे कोणते हार्मोनल कनेक्शन आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
ा आरसा पाहताना अचानक ओठांच्या वर किंवा हनुवटीवर एखादा जाड, काळा केस दिसला की अनेक महिलांच्या काळजात धस्स होतं. मग सुरू होतो तो पार्लरच्या फेऱ्यांचा आणि थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा न संपणारा प्रवास. समाजात आजही असा एक समज आहे की दाढी-मिशा येणं हे केवळ पुरुषांचं लक्षण आहे, पण वास्तवात प्रत्येक महिलेच्या शरीरावर बारीक लव किंवा केस असतातच. मात्र, जेव्हा हे केस दाट आणि स्पष्ट दिसू लागतात, तेव्हा तो केवळ सौंदर्याचा प्रश्न राहत नाही, तर तो शरीरातील एका मोठ्या बदलाचा इशारा असतो.
advertisement
advertisement
नेमकी जबाबदारी कोणत्या हार्मोनची?प्रत्येक स्त्रीच्या शरीरात पुरुष संप्रेरक म्हणजेच 'अँड्रोजन' (Androgen) अतिशय अल्प प्रमाणात तयार होत असते. यात प्रामुख्याने 'टेस्टोस्टेरॉन' (Testosterone) नावाचा हार्मोन असतो. जेव्हा काही कारणास्तव या हार्मोनची पातळी शरीरात वाढते, तेव्हा चेहऱ्यावर, छातीवर किंवा पाठीवर जाड आणि काळे केस येऊ लागतात. हे हार्मोन प्रामुख्याने ओव्हरी (स्त्रीबीजांड) आणि अ‍ॅड्रिनल ग्लँडमधून तयार होतात.
advertisement
चेहऱ्यावर केस येण्याचे सर्वात मोठे आणि सामान्य कारण म्हणजे PCOS (Polycystic Ovary Syndrome). सुमारे 70-80% प्रकरणांमध्ये हीच समस्या दिसून येते. यामध्ये ओव्हरीमध्ये लहान गाठी तयार होतात, ज्यामुळे अँड्रोजन हार्मोनची निर्मिती वाढते.परिणामी, मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, वजन वाढणे आणि नको असलेल्या केसांची वाढ होणे अशा समस्या उद्भवतात.
advertisement
इतर महत्त्वाची कारणेPCOS व्यतिरिक्त इतरही काही कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो:मेनोपॉज (रजोनिवृत्ती): वयानुसार हार्मोन्समध्ये होणारे बदल.औषधांचे दुष्परिणाम: काही विशिष्ट औषधांच्या सेवनामुळे शरीरातील संतुलन बिघडते.अ‍ॅड्रिनल ग्लँड समस्या: या ग्रंथीमध्ये काही दोष असल्यास हार्मोनल असंतुलन होते.जीवनशैली: वाढते वजन आणि चुकीचा आहार देखील अँड्रोजनला उत्तेजन देतो.
advertisement
काय उपाय करावेत?जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल, तर खालील गोष्टींचा विचार करा:सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन 'ब्लड टेस्ट' करून घ्या, ज्यामुळे रक्तातील हार्मोन्सची पातळी स्पष्ट होईल.डॉक्टर तुम्हाला औषधे, लेझर हेअर रिमूव्हल किंवा इतर उपचारांचा सल्ला देऊ शकतात.सकस आहार आणि नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम हार्मोन्सवर होतो.
advertisement
advertisement









