Health Tips: शुगर असूनही दिवाळीत गोडधोड खाल्लंय? रिस्क नको, लगेच करा हे उपाय!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Health Tips: दिवाळीत सगळेजणच गोडधोड, मिठाई खातात. पण असं गोडधोड खाणं अनेकांना महागात पडू शकतं. विशेषत: मधुमेह रुग्णांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.
दिवाळी म्हटलं की मिठाई, गोडधोड आलंच. अनेकजण शुगर, बीपीच्या त्रासामुळे गोडधोड खाणं टाळतात. पण काहीवेळा मोह टाळला जात नाही आणि एखादा पदार्थ खाल्ला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खाणं देखील त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. तेव्हा वेळीच योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
अचानक शुगर वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. असे न करणे धोकादायक ठरू शकते. मात्र, घाबरण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखर लगेच नियंत्रित करू शकता. . याबाबत लोकल18 सोबत बोलताना डॉ. ललित कौशिक (एमडी) यांनी माहिती दिलीये.
advertisement
advertisement
शुगरच्या रुग्णांनी सकाळी लिंबूपाणी किंवा गरम पाणी पिऊ शकतात. मधुमेहावर वेगाने नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्ण सलग 16 तासांचा उपवास करू शकतात. या दरम्यान फक्त लिंबूपाणी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. दीर्घ उपवास केल्याने मधुमेह लवकर आटोक्यात येतो. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement
advertisement