टॉन्सिल्स सुजल्यामुळे घसा दुखतोय, बोलायलाही जमत नाही? करा उपाय, घरीच मिळवा आराम!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हिवाळा ऋतू प्रचंड सकारात्मकता घेऊन येतो. गुलाबी थंडीनं मन अगदी प्रसन्न होतं. मात्र त्यासोबत येतात साथीचे आजार, त्वचेचा रखरखीतपणा आणि घश्याची खवखव, खोकला. या दिवसांमध्ये टॉन्सिल्स सूजण्याचा त्रासही होतो.
advertisement
advertisement
जर टॉन्सिल्सचा त्रास वाढला तर 10 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम काळीमिरी, 40 ग्रॅम वेलची, 80 ग्रॅम तबशीर आणि 160 ग्रॅम खडीसाखर घ्यावी. सर्वकाही एकत्र करून छान एकजीव अशी पावडर बनवावी. ही पावडर सूती कापडात चाळावी. मग तयार झालेली पावडर तुळशीच्या पानात मिसळून चाटावी. यामुळे आराम मिळू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
advertisement










