PCOD आणि PCOS कशामुळे होतो? यावर उपाय काय? डॉक्टरांनी काय सांगितलं पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
या आजारांचा परिणाम वजन, केस, त्वचा इत्यादी पूर्ण आरोग्यावर दिसून येतो. हळूहळू गर्भाशयात गाठीही तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्वचेवर अनावश्यक केसांची वाढ होते, लठ्ठपणाही वाढू शकतो.
मासिकपाळीची सुरूवात हा मुलींच्या आयुष्यातला जणू सोहळा असतो. नियमित मासिकपाळी हे निरोगी आरोग्याचं लक्षण आहे. परंतु आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत आजारपण प्रचंड वाढले आहेत. अशात मासिकपाळीत अनियमितता या त्रासालाही अनेक महिलांना सामोरं जावं लागतं. पाळीत खंड पडला किंवा काहीही त्रास झाला तरी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.
advertisement
डॉ. पुनम बहुरूपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, PCOD आणि PCOS या दोन्ही आजारांची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. यांवर वेळीच उपचार न केल्यास गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात, शिवाय या आजारांचा परिणाम वजन, केस, त्वचा इत्यादी पूर्ण आरोग्यावर दिसून येतो. हळूहळू गर्भाशयात गाठीही तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्वचेवर अनावश्यक केसांची वाढ होते, लठ्ठपणाही वाढू शकतो.
advertisement
1. पोषणयुक्त आहाराचा अभाव : रोजच्या आहारात जर पोषणयुक्त पदार्थांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम शरिरावर होतो. सुदृढ आरोग्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. 2. एकाच जागी बसून काम करणं : शरिराची हालचाल व्हायलाच हवी. बराच वेळ एका ठिकाणी बसून काम केल्यानं वजन वाढतं, हळूहळू स्थूलपणा येतो. तसंच आरोग्यावर इतरही दुष्परिणाम दिसून येतात.
advertisement
3. प्रदूषण : सध्या प्रदूषण प्रचंड वाढलंय. याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यासह मानसिक स्थितीवर होतो. 4. हॉर्मोनल असंतुलन : बदलतं वातावरण आणि औषधांचा दुष्परिणाम यामुळे शरिरात प्रचंड हॉर्मोनल असंतुलन होतं. ज्यामुळे मासिकपाळी अनियमित होऊ शकते. 5. इन्सुलिन पातळीत वाढ : शरिरात इन्सुलिनची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम ओव्हुलेशनवर होतो. ज्यामुळे मासिकपाळीत अनियमिततेचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
उपाय काय? नियमित मासिकपाळीसाठीच नाही, तर संपूर्ण सुदृढ आरोग्यासाठी आहार पोषक असणं आवश्यक आहे. जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि प्रोटिन्सचा समावेश असायला हवा. अति तिखट पदार्थ टाळावे, नियमित व्यायाम करावा, दररोज मेडिटेशन करणंही गरजेचं आहे. तसंच प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं टाळावं. प्लॅस्टिकच्या डब्यात जेवणही करू नये. जंक फूड खाणं टाळावं. दररोज पुरेशी झोप घ्यावी.


