advertisement

कारमध्ये लावा छोटंसं डिव्हाईस, उंदीर गाडीच्या जवळ येणारही नाहीत; लाखो रुपये वाचतील

Last Updated:
सध्याच्या काळात उंदरांमुळे समस्या वाढल्या आहेत. उंदीर कारचंही नुकसान करतात. कारमधल्या वायर्स कुरतडल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
1/7
सध्याच्या काळात उंदरांमुळे समस्या वाढल्या आहेत. उंदीर कारचंही नुकसान करतात. कारमधल्या वायर्स कुरतडल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. वायर्स कुरतडल्याने शॉर्ट सर्किट होतं. त्यामुळे कारमधली यंत्रणा खराब होते. ती दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येऊ शकतो. उंदरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतात.

2/7
अनेकदा प्रवास सुरू असताना कार रस्त्यातच बंद पडते. अशा वेळी नेमकी समस्या समजत नाही. उंदीर कारमधल्या बॅटरीच्या वायर्स, पाइप आणि अनेक वस्तू कुरतडतात. यामुळे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांच्या घरात उंदरांचा उपद्रव जास्त असतो, अशा व्यक्तींना आपली कार वारंवार मेकॅनिककडे न्यावी लागते. यामुळे त्रास आणि खर्च वाढतो.

3/7
उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी रॅट पॉयझनसारख्या वस्तू उपलब्ध आहेत. यामुळे उंदरांचा मृत्यू होतो; पण काही वेळा उंदरांचा मृत्यू अडचणीच्या जागी होतो. त्यानंतर त्यांना बाहेर काढणं अवघड होतं आणि कारमध्ये दुर्गंधी पसरू लागते.

4/7
उंदरांना न मारता पळवून लावणारी अनेक डिव्हायसेस आज बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे उंदीर कारच्या आसपास फिरत नाहीत आणि कार सुरक्षित राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका डिव्हाइसची माहिती देणार आहोत. हे डिव्हाइस उंदरांना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

5/7
उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी तुम्ही रॅट रिपेलंट डिव्हाइस वापरू शकता. हे डिव्हाइस अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. हे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदीबाबत बोलायचं झालं तर हे डिव्हाइस अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या साइट्सवरून 2500 ते 3000 रुपयांत मागवू शकता.

6/7
हे डिव्हाइस कारमध्ये इन्स्टॉल करणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला मेकॅनिककडे जाण्याची गरज नाही. या डिव्हाइसला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन वायर्स असतात. या वायर्स बॅटरीच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट कराव्यात. हे डिव्हाइस कमी प्रमाणात बॅटरीचा वापर करतं आणि जेव्हा कार सुरू असते तेव्हा ते काम करत नाही.

7/7
रॅट रिपेलंट डिव्हाइस अल्ट्रासाउंड लहरी निर्माण करतं. या लहरी उंदरांना सहन होत नाहीत. त्यामुळे उंदीर पळून जातात. तसंच हे डिव्हाइस वॉटरप्रुफ असतं. कारची स्वच्छता करताना ते खराब होत नाही.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement