थंडीत बायकोचे हात-पाय थंड आणि नवऱ्याचे गरम का लागतात? 99 टक्के जोडप्यांना 'या' गोष्टी माहितच नसणार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
याच गोष्टीवर काही रोचक संशोधन झालं आहे आणि त्यातून खूप मनोरंजक माहिती समोर आली आहे.
हिवाळा आला की वातावरणातील गारवा वाढतो आणि प्रत्येकाला सहाजिकच थंडी जाणवू लागते. त्यामुळे लोक रात्री अंगावर चादर घेऊन झोपतात. पण लग्न झालेल्या अनेका जोडप्यांनी एक गोष्ट नक्की अनुभवली असेल की बायकोचे हात-पाय नेहमीच जास्त थंड असतात, तर नवऱ्याचे शरीर तुलनेने गरम राहते. एकाच घरात, एकाच वातावरणात राहणाऱ्या दोघांच्या शरीराच्या तापमानात एवढा फरक कसा काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
advertisement
advertisement
यामागील मुख्य कारणे म्हणजे हार्मोन्स, ताण, रक्तप्रवाह, मेटाबॉलिझम आणि शरीरातील चरबीचे प्रमाण.महिलांच्या शरीरात प्रमुख हार्मोन एस्ट्रोजन असतो, जो मासिक पाळीपासून ते गर्भधारणेपर्यंत अनेक प्रक्रिया नियंत्रित करतो. हिवाळ्यात शरीर "survival mode" मध्ये जातं आणि महत्त्वाच्या अवयवांना उबदार ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतं.
advertisement
advertisement
पुरुषांचे शरीर जास्त गरम का राहते?पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन प्रमुख हार्मोन असतो. टेस्टोस्टेरोनमुळे मांसपेशी वाढतात आणि मांसपेशींमधून अधिक उष्णता तयार होते. सरासरी पुरुषांचे 40% शरीर मांसपेशींनी बनलेले असते. महिलांमध्ये हे प्रमाण 30% असते. यामुळे पुरुषांची बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) महिलांपेक्षा 5-10% जास्त असते.
advertisement
याचा अर्थ पुरुष जास्त कॅलरीज जाळतात आणि शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. महिलांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते, पण बाहेरील अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे हात-पाय थंड राहतात. पुरुषांमध्ये चरबी कमी आणि मांसपेशी जास्त असल्याने रक्तप्रवाह अधिक सुसंगत असतो, त्यामुळे शरीर उबदार राहते.


