Pankaj Dheer Cancer : अभिनेते पंकज धीर यांचा जीव घेणारा कॅन्सर, होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 8 लक्षणं

Last Updated:
Pankaj Dheer Died due to Cancer : अभिनेते पंकज धीर यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. याआधीही काही सेलिब्रिटींनी कॅन्सरमुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे कॅन्सरची लक्षणं काय आहेत हे प्रत्येकाला माहिती असायला हवं.
1/7
महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारलेले अभिनेते पंकज धीर यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या आजाराची अशी काही लक्षणं जी प्रत्येकाला माहिती असायला हवीत.
महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारलेले झाला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या आजाराची अशी काही लक्षणं जी प्रत्येकाला माहिती असायला हवीत.
advertisement
2/7
कोणताही आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणं शरीरावर दिसू लागतात. कॅन्सरच्या बाबतीतदेखील हेच आहे. या आजाराची काही लक्षणं शरीरात दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेणं गरजेचं असतं.

3/7
शरीरावरचा तीळ किंवा मस याचा आकार किंवा रंगात जर बदल झालेला दिसत असेल तर हे कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. याशिवाय जखम न भरणं, त्वचेला खाज सुटणं हेदेखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
शरीरावरचा तीळ किंवा मस याचा आकार किंवा रंगात जर बदल झालेला दिसत असेल तर हे कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. याशिवाय जखम न भरणं, त्वचेला खाज सुटणं हेदेखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
advertisement
4/7
कॅन्सरच्या पेशी वेगानं विभाजित होतात. त्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे जर कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर हा कदाचित कॅन्सर असू शकतो.
कॅन्सरच्या पेशी वेगानं विभाजित होतात. त्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे जर कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर हा कदाचित कॅन्सर असू शकतो.
advertisement
5/7
शरीराच्या कोणत्याही भागात विनाकारण गाठ किंवा सूज येणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. विशेषतः ब्रेस्ट, टेस्टिकल्स किंवा घशात गाठ आली असेल, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. तोंड, घसा किंवा पचनसंस्थेत कुठेही कॅन्सरची गाठ असेल तर जेवताना त्रास होतो.  घास गिळणं कठीण होतं.

6/7
मलावाटे रक्त पडणं, महिलांमध्ये मासिक पाळीव्यतिरिक्त असामान्य रक्तस्राव होणं किंवा जखम, दुखापत झालेली नसताना रक्तस्राव होणं ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात. अनियमित आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होणं किंवा मेनोपॉजनंतर रक्तस्राव होणं हे असमान्य असतं. अशा वेळी तपासणी करणं गरजेचं आहे.

7/7
रात्रीच्या वेळी हाडांमध्ये वेदना जाणवणं किंवा एखादा अवयव सातत्याने दुखणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.शारीरिक थकवा जाणवणं ही सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला जर विनाकारण थकवा जाणवत असेल आणि विश्रांती घेऊनही थकवा कमी होत नसेल तर हा कॅन्सर असू शकतो.
रात्रीच्या वेळी हाडांमध्ये वेदना जाणवणं किंवा एखादा अवयव सातत्याने दुखणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. शारीरिक थकवा जाणवणं ही सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला जर विनाकारण थकवा जाणवत असेल आणि विश्रांती घेऊनही थकवा कमी होत नसेल तर हा कॅन्सर असू शकतो.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement