Mango Benefits : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंबा खावा का, प्रमाण किती असावं?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याशिवाय उन्हाळा एन्जॉय करण्याचा आनंद मिळत नाही. फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा खाण्यासाठी खूपच चविष्ट असतो. आरोग्यासाठीही तो फायदेशीर आहे. पण चवीला खूप गोड असणारे हे फळ मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहिती आहे का, मधुमेहाचे रुग्णही योग्य प्रमाणात हे फळ खाऊ शकतात.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक शुगरमुळे तो योग्य प्रमाणात खाणं केव्हाही चांगले. चला तर, आंबे खाण्याचे फायदे काय? दिवसातून किती आंबे खावेत? मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का? याबाबत आज जाणून घेऊ.
advertisement
आंब्यामध्ये असणारी नैसर्गिक साखर ही नेहमीच्या साखरेपेक्षा आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे. मात्र, शुगर किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंबा अतिशय योग्य प्रमाणात खावा. विशेषत: ज्यांची शुगर लेव्हल हाय असते, त्यांनी आंबा खाताना काळजी घ्यावी. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आंबा खाण्यास मनाई नाही, पण तो खाण्याचं प्रमाण योग्य हवे. तुम्ही आंबा चिरून त्याच्या फोडी खाऊ शकता. मात्र, मँगो शेक किंवा ज्यूस पिणं टाळा.
advertisement
advertisement
आंब्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जाते. पोटॅशियम हृदयाचे ठोके व तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आंबा उत्कृष्ट मानला जातो. आंब्यात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. जे डोळ्यांसाठी चांगले असते. डोळ्यांशी संबंधित फायदे देते. रोगांपासून डोळांचा बचाव करते.
advertisement
advertisement