आंबा खाल्ल्याने खरंच पिंपल्स येतात का? आंबा सौंदर्यासाठी खूप फायदेशीर, पण लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आंबा खाल्ल्याने पिंपल्स येतात, हा समज अर्धवट आहे. खरं म्हणजे आंबा त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण त्यात अॅन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन A, C, मँगीफेरिन आणि...
उन्हाळा आला की सगळ्यांनाच आंबे खूप आवडतात. आंब्याला नाही कोण म्हणेल? पण बऱ्याच बायका सांगतात की उन्हाळ्यात आंबे खाल्ले की पिंपल्सची समस्या येते. आपल्यापैकी कोणी ना कोणीतरी हे नक्की म्हटलं असत की, आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पण खरं तर आंबा आपल्या त्वचेसाठी फायद्याचा असतो. आता उन्हाळ्यात आंबा खायचा मोह तर आवरवत नाही! पण या पोस्टमध्ये आपण हे सविस्तरपणे जाणून घेऊया की ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत त्यांनी आंबा खावा की नाही?
advertisement
आपण बाजारात बघतो की, आंब्यांवर पाणी मारतात. पण ते नुसतं पाणी नसतं. असं म्हणतात की ते पाणी कीटकनाशक असतं, ज्यामुळे आंबे ताजे राहतात. म्हणून आंबे खाण्याआधी ते चांगले धुवा आणि त्यांची साल पूर्णपणे काढा. हे कीटकनाशक आपल्या त्वचेला पुरळ आणि पिंपल्स देऊ शकतात. पण सगळेच फळ आपल्या त्वचेसाठी वाईट नसतात. पण आजकल बाजारात नैसर्गिकरित्या काहीच मिळत नाही. सगळं कृत्रिम खतं आणि प्रिझर्व्हेटिव्हज वापरून टिकवलेलं असतं.
advertisement
गोड आणि रसाळ आंबा उन्हाळ्यात मिळतो आणि त्यात आपल्या शरीराला लागणारे खूप सारे पोषक तत्व असतात. म्हणूनच त्याला फळांचा राजा म्हणतात. हा आंबा फक्त चवीलाच भारी नसतो, तर त्याचे औषधी गुणधर्मही आहेत. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते आपल्या त्वचेच्या आतल्या थरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतात.
advertisement
याशिवाय, ते आपली त्वचा आणि शरीराला वाईट बॅक्टेरिया आणि इतर समस्यांपासून वाचवतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर असतं, जे वाढत्या वयाची चिन्हं कमी करायला मदत करतं. आंब्यामध्ये व्हिटॅमिन 'सी', मॅंगिफेरिन, फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स भरपूर असतात, जे कोलेजन तयार करायला मदत करतात. महत्त्वाचं म्हणजे, ते आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतात.
advertisement
आंबा खाल्ल्याने पिंपल्स येऊ शकतात हे खरं आहे. पण त्यासाठी पूर्णपणे फळाला दोष देता येणार नाही. हे फळ खायला चांगलं आहे कारण त्यात खूप सारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. पण डॉक्टर्स असं सांगतात की ज्या महिलांना इन्सुलिनची समस्या आहे किंवा ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे, त्यांनी आंबा जपून खायला हवा.