1 वाटी कळणा अन् अर्धी वाटी बेसन, कळण्याच्या गोळ्याची भाजी बनवा घरीच, विदर्भ स्पेशल रेसिपी पाहा

Last Updated:
कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते. कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची? याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
1/7
विदर्भातील खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कळण्याचे गोळे. कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते.

advertisement
2/7
 तुरीच्या नवीन डाळीपासून कळणा तयार होतो. या कळण्यापासून कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची? याचीच रेसिपी<a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/"> वर्धा</a> येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.

3/7
कळण्याच्या गोळ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य : 1 वाटी कळणा, अर्धी वाटी बेसन, पेस्टसाठी जाड चिरलेला कांदा, जाड चिरलेला टोमॅटो, भाजलेले थोडे खोबरे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, मसाला, धने पावडर हे साहित्य लागेल.

4/7
कळण्याच्या गोळ्याची भाजी बनवण्यासाठी कृती : सर्वप्रथम कळण्यामध्ये थोडं बेसन बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, तिखट, हळद, मीठ, धणेपूड, अ‍ॅड करून घ्या. आता पाण्याच्या साह्याने घट्ट गोळा तयार करा. आता त्याचे छोटे गोळे तयार करून घ्या.

5/7
आता जाड कांदा, टोमॅटो मिरची आणि भाजलेले खोबरे यांची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या. आता कढईत तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात ही पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट अ‍ॅड करून मंद आचेवर चांगली शिजू द्या.

6/7
आता त्यात तिखट, हळद, मसाला, धनेपावडर, मीठ हे अ‍ॅड करून चांगले शिजू द्या. आता त्यात पाणी घालून उकळी आल्यावर तयार केलेले कळण्याचे गोळे सोडा, गोळे टाकल्यावर लगेच चमच्याने ढवळू नका. अशाने गोळे फुटू शकतात. थोड्या वेळाने चमच्याने ढवळून घेऊ शकता. 5-10मिनिटे गोळे उकळल्यानंतर कळण्याच्या गोळ्याची भाजी तयार आहे.

7/7
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement