टोमॅटो सालीसकट खावा की साल काढून? आहारतज्ज्ञांनी सांगितली कोणती पद्धत योग्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Best Way To Eat Tomato: बरेच लोक टोमॅटोची साल खात नाहीत आणि सोलल्यानंतरच टोमॅटो वापरतात. तर बहुतेक लोक टोमॅटो धुतात सालीसकट वापरतात. पण मग टोमॅटो वापरण्याची नेमकी कोणती पद्धत योग्य हे आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
टोमॅटोची साल फायबरचा चांगला स्रोत आहे, जी पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. टोमॅटोची साल पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी करते. आहारतज्ज्ञ म्हणतात की जर तुम्हाला निरोगी पचन हवं असेल तर टोमॅटो सोलू नका. टोमॅटोची साल काढून टाकल्याने त्यातील पोषण कमी होऊ शकते. म्हणून टोमॅटो सालासह खावे.
advertisement
टोमॅटोची साल काढून टाकल्याने त्याचे सर्व पोषक घटक निघून जातात असं नाही. टोमॅटोचा गर देखील पोषक तत्वांनी भरलेला असतो. जर तुम्हाला टोमॅटोचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही टोमॅटो त्याच्या सालीसह खावा. जरी तुम्हाला साल काढावी लागली तरी ती हळूहळू आणि संतुलित पद्धतीने करा जेणेकरून पोषण कमी होणार नाही.
advertisement
advertisement
advertisement