Sugar Vs Jaggery : साखर की गूळ, तुमच्या आरोग्यासाठी काय चांगलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sugar Or Jaggery : साखर आणि गूळ दोन्ही उसापासूनच बनवले जातात. पण दोन्ही बनवण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे त्यातील घटकही बदलतात आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणामही वेगवेगळा आहे.
advertisement
साखरेचं जास्त सेवन करणं आपल्यासाठी हानिकारक आहे हे निश्चितच आहे. पण आपल्या जिभेला साखरेची चव जास्त आवडू लागली आहे. गूळ हा त्याचा पर्याय असू शकतो का? खरंतर म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीत गूळ मिसळू शकत नाही. अशा परिस्थितीत गूळ की साखर आपल्यासाठी काय चांगलं? याबद्दल क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गूळ ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. ते रिफायनिंग करून बनवलं जात नाही आणि त्यात कोणतंही रसायन मिसळलं जात नाही. चुलीवर गूळ सोप्या पद्धतीने बनवला जातो. अशा प्रकारे गूळ शुद्ध होतो. दुसरीकडे, साखर ब्लीच केली जाते आणि त्यात अनेक प्रकारची रसायनं मिसळली जातात, त्यानंतर ती पांढरी दिसते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अधूनमधून जास्त गूळ खाल्लं तर कोणतंही मोठं नुकसान होत नाही.
advertisement
गूळ थेट उसापासून बनवला जातो. म्हणून गुळामध्ये सर्वाधिक लोह असते. याशिवाय त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त आणि सेलेनियम सारखे घटक देखील असतात. गूळ ही एक जटिल साखर आहे ज्यामध्ये सुक्रोज रेणू दुव्यांच्या स्वरूपात असतात. याशिवाय, गुळामध्ये अनेक प्रकारची खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात.
advertisement