55 पिकांची शेती अन् ग्रामीण संस्कृतीचं दर्शन, पुण्याजवळचा आनंदमळा पाहिलात का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आनंदमळा येथे आमराई, शेतावरील प्राणी, फूड फॉरेस्ट, मसाला आणि औषधी वनस्पती अशी विविध आकर्षणे पाहायला मिळतात.
advertisement
पुणेकरांनाही अशा पर्यटनाचा आनंद घेता येत आहे. हिंजवडीजवळ दारुंब्रे येथे समीर वाघोले यांनी आनंदमळा नावानं कृषी पर्यटन केंद्र विकसित केलंय. या ठिकाणी ग्रामीण संस्कृतीचं अनुभव घेत जैवविविधता पाहण्याची संधी मिळते.
advertisement
हिंजवडीपासून जवळच दारुंब्रे हे गाव आहे. याठिकाणी समीर वाघोले यांनी 2016 मध्ये नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी शाश्वत शेतीचे मॉडेल तयार केले. त्याला व्यवसायाची जोड दिली. 2018 मध्ये येथे आनंदमळा हे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. याठिकाणी ग्रामीण संस्कृती आणि जैविविधता पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली, असे समीर वाघोले सांगतात.
advertisement
नैसर्गिक शेती, ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावाचा अनुभव देणारं वातावरण याठिकाणी पाहायला मिळतं. 10 एकरावरील विस्तीर्ण नैसर्गिक शेती, त्यासाठी आवश्यक असणारी जैवविविधता, फुलपाखरु उद्यान, बोटॅनिकल गार्डन, नैसर्गिक देवराई, खास लहान मुलांकरीत बनविलेली शेतीची लहान मॉडेल्स इथे पाहायला मिळतात. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणारी परिसंस्थाही इथे बघायला मिळते, असे वाघोले सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement