Narcissistic Behavior म्हणजे काय असतं? तुमचा पार्टनर देखील असा वागत असेल तर ही धोक्याची घंटा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्या जोडीदाराला कायम स्वतःचं महत्त्व सांगणं, दुसऱ्याला कमी लेखणं आणि सतत स्वतःच्या स्तुतीत रमणं असा त्याच्या स्वभाव असतो. पण हे सगळं 'नार्सिसिस्टिक' वर्तनाचं लक्षण असू शकतं.
advertisement
कधी कधी नात्यात असा एक व्यक्ती असतो, ज्याला स्वतःविषयीच जास्त आकर्षण असतं. ज्याला वाटतं की जग फक्त त्याच्या भोवती फिरतंय. आपल्या जोडीदाराला कायम स्वतःचं महत्त्व सांगणं, दुसऱ्याला कमी लेखणं आणि सतत स्वतःच्या स्तुतीत रमणं असा त्याच्या स्वभाव असतो. पण हे सगळं 'नार्सिसिस्टिक' वर्तनाचं लक्षण असू शकतं.
advertisement
'नार्सिसिस्ट' म्हणजे नेमकं काय?'नार्सिसिस्ट' (Narcissist) हा असा व्यक्ती असतो, जो स्वतःलाच सर्वोत्तम समजतो, इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचं महत्त्व वाढवतो. अशा व्यक्तींना दुसऱ्यांकडून स्वत:ची प्रशंसा हवी असते, केंद्रस्थानी राहणं आवडतं आणि जर असं झाल नाही तर ते चिडतात, रागावतात किंवा खोट्या सहानुभूती मिळवण्यासाठी काहीही गोष्टी सांगू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









