GK : तो ना वाघाला घाबरत ना सिंहाला, सापाच्या विषाचाही होत नाही परिणाम; कोण आहे जगातील सर्वात धाडसी जीव?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जंगलात एक असा प्राणी आहे, जो सिंहाला न घाबरता समोर उभा राहतो… आणि जगातील अत्यंत विषारी सापाने चावलं तरी काही वेळात पुन्हा उठून चालायला लागतो? ऐकून विश्वास बसत नाही ना? आणि हा प्राणी कोण असेल? हे ऐकायला उत्सुकता वाढली असेल ना? चला तर मग जाणून घेऊया या ‘छोटा पॅकेट, मोठा धमाका’ प्राण्याबद्दल, कोण आहे हा धाडसी प्राणी?
आपण नेहमी एखाद्याच्या धाडसाचं कौतुक करताना म्हणतो ना “तो सिंहासारखा धाडसी आहे!” किंवा “वाघाचं काळीज आहे त्याच्याकडे” कारण हे दोन प्राणी जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी मानले जातात. कारण यांची नुसती चाहूल जरी लागली तरी देखील इतर प्राणी तिथून पळ काढतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की जंगलात एक असा प्राणी आहे, जो सिंहाला न घाबरता समोर उभा राहतो… आणि जगातील अत्यंत विषारी सापाने चावलं तरी काही वेळात पुन्हा उठून चालायला लागतो? ऐकून विश्वास बसत नाही ना? आणि हा प्राणी कोण असेल? हे ऐकायला उत्सुकता वाढली असेल ना?
advertisement
advertisement
या प्राण्याचं नाव आहे हनी बॅजर (Honey Badger)दिसायला तो एखाद्या लहान अस्वलासारखा वाटतो. वैज्ञानिक भाषेत त्याला मेलिवोरा कॅपेन्सिस म्हणतात. आकाराने छोटा असला तरी धैर्याच्या बाबतीत हा प्राणी जंगलातील मोठ्या शिकाऱ्यांनाही टक्कर देतो. त्याच्या निर्भीड स्वभावामुळे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्याची नोंद “जगातील सर्वात धाडसी प्राणी” म्हणून करण्यात आली आहे.
advertisement
सिंह, बिबट्या… कुणालाही नाही घाबरतजंगलात सिंह किंवा बिबट्या समोर आला तर बहुतांश प्राणी पळ काढतात. पण हनी बॅजर मात्र मागे हटत नाही. तो आपल्या तीक्ष्ण पंज्यांनी आणि आक्रमक स्वभावाने प्रतिकार करतो. तो आकाराने लहान असला तरी आत्मविश्वास आणि जिद्दीमुळे मोठ्या प्राण्यांनाही दोन पावलं मागे हटायला लावतो.
advertisement
विषारी सापाचाही होत नाही परिणाम?याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची जाड आणि लवचिक कातडी. सापाचे सुळे किंवा मोठ्या शिकाऱ्यांचे दात सहजपणे त्याची त्वचा भेदू शकत नाहीत. जर एखाद्या किंग कोब्रासारख्या विषारी सापाने चावलं, तर हनी बॅजर काही काळ सुस्त किंवा बेशुद्ध पडतो. पण काही वेळानंतर तो पुन्हा उठतो जणू काहीच झालं नाही. निसर्गाने त्याला विषाविरुद्ध लढण्याची खास रोगप्रतिकारक क्षमता दिली आहे आणि गंमत म्हणजे, उठल्यावर तो त्या सापालाच आपलं अन्न बनवतो.
advertisement
राहतो कुठे हा ‘सुपरहिरो’?हनी बॅजर मुख्यतः आफ्रिकेतील जंगलांमध्ये आढळतो. तसंच नैऋत्य आशिया आणि भारतातील काही जंगली भागांतही त्याचं वास्तव्य आहे. वाळवंट, काटेरी झुडपे, खडकाळ डोंगर कोणतीही कठीण परिस्थिती असो, हा प्राणी सहज तग धरतो. त्याला मध खूप आवडतो. मध मिळवण्यासाठी तो सरळ मधमाश्यांच्या पोळ्यावर हल्ला करतो. हजारो मधमाश्या डंख मारल्या तरी त्याच्या जाड कातडीमुळे त्याला फारसा त्रास होत नाही. याशिवाय तो साप, पक्षी आणि लहान प्राण्यांची शिकारही करतो.
advertisement









