Beed Weather : मराठवाड्यात पुन्हा हवापालट, दुपारनंतर मोठं संकट, बीड, लातूरला अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
दुपारी आणि संध्याकाळी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आज बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज बीडमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सियस, लातूरमध्ये 41 अंश, धाराशिवमध्ये 41 अंश आणि नांदेडमध्ये 43 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. दुपारी आणि संध्याकाळी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
बीड जिल्ह्यात आज आकाश हलकं ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. येत्या दोन दिवसांत तापमान उच्च पातळीवर राहील आणि 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की पिके आणि धान्य योग्य प्रकारे संरक्षित करावे.
advertisement
लातूर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस उन्हाचा तीव्रतेने अनुभव येईल. आकाश मुख्यतः साफ राहील परंतु तापमान 40 अंशांच्या वर राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे व पुरेसे पाणी प्यावे अशी सूचना प्रशासनाने केली आहे. वाऱ्याचा जोर थोडाफार वाढू शकतो त्यामुळे झाडांखाली थांबणे धोकादायक ठरू शकते.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातही आज कमाल तापमान 41 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. संध्याकाळी काही भागांत विजांचा गडगडाट आणि हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस उन्हाचे प्रमाण जास्त राहील आणि हलक्याफुलक्या सरी वगळता फारसा बदल अपेक्षित नाही. हवामानातील अचानक बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे.
advertisement
नांदेड जिल्ह्यात आज उष्णतेचा प्रकोप अधिक आहे. येथे तापमान 43 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. हवामान विभागाच्या सतत अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या सूचना पाळाव्यात.