Beed Weather: नांदेडमध्ये उष्णतेची लाट, बीड, लातूरला काय स्थिती? आजचा हवामान अंदाज
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उन्हाचे चटके जाणवत असून तापमान 42 अंशांच्या पार गेलंय. नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूरचा आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची उष्णतेची तीव्रता वाढली आहे. आज देखील मराठवाड्याचा पारा 42 पार राहणार आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 42 अंश ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. पुढील दोन-तीन दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
बीड जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. येथील आकाश स्वच्छ राहणार असून दुपारी ऊन खूप तीव्र असेल. 25 एप्रिल रोजीही बीडमध्ये तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे दुपारी गरजेशिवाय बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement








