हिरवळ अन् मोकळे रस्ते! लोणावळा-खंडाळा नाही, नवी मुंबईत टॉप पर्यटन स्थळं

Last Updated:
पावसाळ्यात किंवा वर्षभरात इतरवेळी विकेंड आला की पर्यटक लोणावळा-माथेरानला आवर्जून जातात. त्यामुळे तिथे मोठी गर्दी होते. मग मुंबईत पर्यटनासाठी कोणती ठिकाणं खास आहेत याचा शोध आपण घेत असतो. आज आपण मुंबईजवळ असलेली नवी मुंबईतील काही खास निसर्गरम्य ठिकाणं पाहणार आहोत, जिथं तुम्ही मुलांसोबत एन्जॉय करू शकता. याठिकाणी आपल्याला हिरवळ, मोकळे रस्ते आणि अल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळेल. (पियुष पाटील, प्रतिनिधी / नवी मुंबई)
1/7
नेरुळ फ्लेमिंगो पॉइंट : इथल्या पाणथळ प्रदेशात असंख्य फ्लेमिंगो पाहायला मिळतात. फ्लेमिंगोची सुंदर छायाचित्र टिपण्यासाठी याठिकाणी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात.

advertisement
2/7
बेलापूरचा किल्ला : या ऐतिहासिक वास्तूत आपण मुलांना घेऊन जाऊ शकता. त्यांना तिथं इतिहासाबाबत माहिती मिळेल.

3/7
सागर विहार गार्डन : नवी मुंबईतील वाशी इथं असलेल्या या गार्डनमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटन येतात. इथं रंगीबेरंगी फुलं आणि विविध प्रजातींच्या वनस्पती पाहायला मिळतात.

4/7
कर्नाळा पक्षी अभयारण्य : पक्षीप्रेमी असाल तर नवी मुंबईतील हे ठिकाण आपल्यासाठी बेस्ट आहे. इथं निसर्ग जवळून अनुभवता येईल. विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतील, शिवाय ट्रेकिंगचा आनंदही घेता येईल.

5/7
नेरुळ बालाजी मंदिर : नेरुळच्या पश्चिमेला एका छोट्या टेकडीवर हे मंदिर वसलेलं आहे. याठिकाणी गणपती मंदिर आणि श्री पद्मावती देवी मंदिरदेखील आहे. इथं निसर्गरम्य, शांत वातावरणात भाविक दर्शनासाठी येतात.

6/7
वंडर्स पार्क : नवी मुंबईतील याठिकाणी आपल्याला जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. या पार्कमध्ये सुंदर तलावसुद्धा आहे. इथं निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळतं.

7/7
सेंट्रल पार्क : हे मोठं थीम पार्क आहे. या उद्यानात डान्स, म्युझिक, स्पोर्ट्स क्लब, एंटरटेनमेंट राइड, थिएटर शो, इत्यादी अनुभवायला मिळतं. खारघरमध्ये असलेल्या या पार्कमध्ये कॅफेसुद्धा आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement