advertisement

Cold Wave: हाडं गोठवणारी थंडी, मराठवाड्यात पुन्हा घसरला पारा, आज कुठं कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather update: मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला असून तापमानाचा पारा घसरला आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
राज्यात उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कडाक्याच्या थंडीचा शिरकाव झालेला आहे, तसेच मराठवाड्यातील तापमानात काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज 19 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात साधारणतः कोरडे वातावरण असणार आहे. तसेच कडाक्याची थंडी देखील असणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना, परभणी, आणि बीड जिल्ह्यात वातावरण कोरडे राहणार असून आकाश निरभ्र असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहू शकते, तर जालन्यामध्ये किमान तापमान 12 असण्याची शक्यता आहे.

3/5
हिंगोली, नांदेड, जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका जाणवणार आहे. तसेच साधारणतः आकाश निरभ्र असणार आहे. आज नांदेडमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहू शकते. या ठिकाणी देखील वातावरणाच्या चढ उतारामुळे गारठा वाढण्याची शक्यता आहे.

4/5
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात वातावरण कोरडेच असणार आहे. लातूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान 12 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. यावेळी आकाश निरभ्र राहील आणि काही प्रमाणात थंडी देखील असणार आहे.

5/5
हवामान विभागाने मंगळवारी पाच जिल्ह्यांना थंडीचा 'येलो अलर्ट' हवामान विभागाने जारी केला होता. आज बुधवारी मात्र सतर्कतेचा कुठलाही अलर्ट मराठवाड्याला देण्यात आला नाही. तरी देखील वातावरण बदलामुळे आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement