Weather Alert: मराठवाड्यात वारं फिरलं, पुन्हा विजा कडाडणार, 3 जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. आज 3 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/5
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाड्यात देखील पावसाने काहीशी उघडीप दिली होती. आता मात्र पुन्ह हवामानात बदल जाणवत आहेत. 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने आज जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. तर उर्वरित 5 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगांचा गडगडाट देखील होऊ शकतो.

3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, या जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना सतर्कतेचा 'यलो अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. यावेळी हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

4/5
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास मराठवाड्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. 25 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5/5
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शतेकरी हवालदिल झाला आहे. आता काही जिल्ह्यांत पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement