Weather Alert: विजा कडाडणार, ढगांचा गडगडाट होणार, बाप्पाच्या आगमनाला धो धो पाऊस, मराठवाड्यात अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: गणपती आगमनाआधीच मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 26 ऑगस्ट रोजी 2 जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/5
राज्यात गणपती आगमनाचे वेध लागले असतानाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात जोरदार पावसानंतर आता मान्सूनने उघडीप घेतल्याचे चित्र होते. परंतु, आता पुन्हा वारं फिरलं असून पावसाची उघडझाप सुरू आहे. सोमवारी चार जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला होता. आज 26 ऑगस्ट रोजीचा छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यात पावसाची स्थिती सातत्याने बदलत आहे. आज मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना सतर्कतेचा 'यलो अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगरसह, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात सामान्यतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून ढगांचा गडगडाट देखील होऊ शकतो.

3/5
मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. आज या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी ताशी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

4/5
पुढील काही काळ मराठवाड्यातील हवामान अनिश्चित स्वरुपाचं राहणार आहे. सातत्याने वातावरणात बदल जाणवू शकतात. गणपती आगमनाच्या दिवशी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतर पुन्हा हिंगोली आणि नांदेडमध्ये पाऊस होईल.

5/5
सतत बदलणाऱ्या हवामानमुळे शेतकरी संकटात आहे. तसेच नारिकांना आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement