Weather Alert: बंगालच्या उपसागरात वारं फिरलं, मराठवाड्यात हवापालट, IMD चा 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather update: बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/6
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यासह मराठवाड्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज 4 डिसेंबर रोजी मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार आहे. तापमानात वाढ झाली तरी थंडी काही प्रमाणात कायम असणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ओसरल्यानंतर पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/6
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे राहील. कमाल तापमान 29.2 अंश तर किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस इतके राहील. जालना जिल्ह्यात मात्र दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच येथे कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.1 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात जवळपास दोन अंशांची घसरण होऊ शकते, त्यामुळे थंडी अधिक तीव्र भासणार आहे.

3/6
परभणी जिल्ह्यातही आकाश स्वच्छ राहून पहाटेच्या वेळेला गारवा मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाश राहणार आहे. वातावरणातील बदलांमुळे गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअस राहील.

4/6
हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत आकाश स्वच्छ आणि निरभ्र राहणार आहे. वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील कोरडेपणा तसेच काही ठिकाणचे ढगाळ वातावरणामुळेही तापमानात घसरण होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

5/6
लातूर जिल्ह्यातील थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून गुरुवारी तापमानात वाढ होणार आहे. हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 29.0 अंश आणि किमान तापमान 17.0 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यामुळे दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके जाणवू शकतात. धाराशिव जिल्ह्यातही तापमान कमी होण्याची चिन्हे आहेत.

6/6
मराठवाड्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत तापमान 9 ते 11 अंश सेल्सियसदरम्यान राहील. आज मराठवाड्यातील आठ पैकी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र वातावरणातील अनियमित बदलांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

ZP Election Municipal elections : निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन
निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!
  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

View All
advertisement