रविवारच्या सुट्टीला पावसाची हजेरी, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
गेले काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
गेले काही दिवस दडी मारून बसलेला राज्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
advertisement
2/5
आज, 22 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. 22 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सियस एवढे असेल.

4/5
दरम्यान, गेल्या 2 दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. 21 सप्टेंबर रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. पण अद्याप शहारत पाऊस झालेला नाही. आज पुन्हा शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5/5
मराठवाड्यात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली असून उष्णता जाणवू लागली आहे. तर शेती पिकांना पाणी पाजण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांचे योग्य नियोजन आणि आवश्यक फवारणी करण्याची गरज आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement