Weather Update: महाराष्ट्रावर नवं संकट, शीत लहरीचं मोठं आक्रमण; 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Maharashtra Weather Update: नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात झाली. आता राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. उत्तरेकडून राज्यात थंड हवेचे प्रवाह कायम आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका जास्त आहे. 8 जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात, 18 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील?
advertisement
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांत 18 नोव्हेंबर रोजी शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
18 नोव्हेंबर रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात धुळे, नाशिक, जळगाव छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करावा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.


