Monsoon Health: पावसाळ्यातील आजारांचं कारण काय? अशी काळजी घेतल्यास राहाल सुरक्षित

Last Updated:
Monsoon Health: सध्या राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दगफुटी सदृश्य पाऊस पडून नद्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी कित्येक दिवसांपासून सूर्याचं दर्शन देखील झालेलं नाही. अशा वातावरणात अनेक आजारांचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
1/7
पावसाळ्यात वातावरण ढगाळ आणि थंड असते. अशा वातावरणात संसर्गजन्य आजारांचे विषाणू पोसण्यास आणि प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे या काळात आरोग्य जपण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेत.

advertisement
2/7
पावसाळ्यामुळे सगळीकडे पाणी आणि चिखल साचलेला दिसतो. त्यामुळे डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. या काळात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. आजारी पडल्यानंतर किंवा अंगात ताप असल्यास आंघोळ करणं टाळलं जातं.

3/7
ही पद्धत योग्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. आजारी असल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं आहे. आजारी असल्यावर स्वच्छता ठेवल्यास जंतू संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

4/7
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत फार दक्षता घेतली पाहिजे. कारण, पाण्याच्या माध्यमातून टायफॉईड आणि अतिसारासारखे आजार होऊ शकतात. पाणी फिल्टरचं असलं तरीही त्याचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण झालेलं नसतं. कधीकाधी त्या पाण्यातूनही संसर्ग होऊ शकतो.

5/7
पावसाळ्यात पिण्याचं पाणी उकळूनच प्यायलं पाहिजे. पाणी उकळून पिण्याची पारंपारिक पद्धत फायद्याची आहे. तुम्ही दररोज सकाळी पाणी उकळून ते थंड करून नंतर पिण्यासाठी वापरू शकता. यामुळे पावसाळ्यात पाण्यातून होणारा संसर्ग त्यामुळे रोखला जातो.

6/7
पावसाळ्यात पाण्याबरोबरच आहाराची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. या ऋतूमध्ये चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, बाहेरचा आहार हा टाळला पाहिजे. कारण, बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्यास आजाराचा धोका वाढू शकतो.

7/7
पावसाळ्यात सकस आहार घ्यावा. आहारात प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. भाजीपाला, फळांचे प्रमाण अधिक असावं. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार झाल्यास आजार वाढत नाही.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement