Election EVM Voting : ईव्हीएम मधेच बिघडलं! तुम्ही मत दिलं ते वाया गेलं, आधीच्या मतदानाचं काय होतं?

Last Updated:
EVM Problem Voting : महापालिका निवडणुकांसाठी मतदान होतं आहे. मतदानादरम्यान EVM मध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे मशीनमध्ये बिघाड झाला तर आधी केलेल्या मतांचं काय होतं? असा प्रश्न पडतोच.
1/5
इथं इव्हीएम मशीन बंद पडलं, तिथं इव्हीएम मशीन बिघडलं.... महापालिकांसाठी मतदान सुरू होऊन काही तास झाले नाही तोच ईव्हीएममध्ये बिघाडाच्या बातम्या समोर येत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे. कित्येक लोकांनी वोटिंग केलं आहे. यानंतर ईव्हीएममध्ये बिघाड झाला मग ज्यांनी मतदान केलं, त्यांच्या मतांचं काय? ते मत वाया जाणार का? ईव्हीएममधील आधींच्या मतांचं काय होतं?

advertisement
2/5
EVM  म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या EVM मध्ये तीन मुख्य भाग असतात, बॅलोट युनिट, म्हणजे मतदार जिथे बटण दाबतो, नंतर कंट्रोल युनिट जो मतदान अधिकाऱ्याजवळ असतो आणि VVPAT म्हणजे मताची छापील पावती काही सेकंद दाखवते. मतदाराने बटन दाबताच मत कंट्रोल युनिटमधील मेमरीत नोंदवलं जातं.

3/5
EVM बिघडलं म्हणजे स्क्रीन किंवा लाईट बंद होते, बटण काम करत नाही, VVPAT अडकतं, बॅटरीचा समस्या अशा अडचणी असतात. EVM मध्ये बिघाड होताच मतदान तात्पुरतं थांबवलं जातं, मतदान अधिकारी मशीन वापरणं बंद करतो. बिघडलेलं EVM वेगळं केलं जातं. नवीन EVM मशीन आणलं जातं नवीन मशीन सुरू करण्याआधी सर्वांसमोर झिरो वोट असल्याची खात्री केली जाते. मतदान पुन्हा सुरू केलं जातं. पुढील मतदार नवीन मशीनवर मतदान करतात.

4/5
बिघडलेलं EVM अधिकृतरीत्या सील केलं जातं. त्यावर तारीख, वेळ आणि अधिकाऱ्यांच्या सही घेतल्या जातात. उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. नंतर हे मशीन स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतं. पण या जुन्या एव्हीएममधील मतांचं काय?

5/5
तर एव्हीएममध्ये वापरली जाणारी मेमरी ही Non-Volatile Memory असते. म्हणजे लाइट गेली, मशीन बंद पडलं, बॅटरी संपली तरीही एकदा नोंदवलेली मतं कधीही डिलीट होत नाहीत किंवा बदलत नाहीत. ती पूर्णपणे सुरक्षित राहतात. मतमोजणीच्या वेळी जुनी आणि नवी अशी सर्व EVM एकत्र आणली जातात प्रत्येक मशीनमधील मतं वेगवेगळी मोजली जातात. नंतर त्या मतांची एकूण बेरीज करून अंतिम निकाल जाहीर होतो. त्यामुळे EVM बिघडल्यामुळे एकही मत वाया जात नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
तर एव्हीएममध्ये वापरली जाणारी मेमरी ही Non-Volatile Memory असते. म्हणजे लाइट गेली, मशीन बंद पडलं, बॅटरी संपली तरीही एकदा नोंदवलेली मतं कधीही डिलीट होत नाहीत किंवा बदलत नाहीत. ती पूर्णपणे सुरक्षित राहतात. मतमोजणीच्या वेळी जुनी आणि नवी अशी सर्व EVM एकत्र आणली जातात प्रत्येक मशीनमधील मतं वेगवेगळी मोजली जातात. नंतर त्या मतांची एकूण बेरीज करून अंतिम निकाल जाहीर होतो. त्यामुळे EVM बिघडल्यामुळे एकही मत वाया जात नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिल्याचं वृत्त ने दिलं आहे.
advertisement
BMC Election: पहिल्या तासात  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला,  मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ
  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू

  • काहींची नावे वगळल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

  • दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.

View All
advertisement