कोल्हापूरच्या चिमुकलीचा आणखी एक विक्रम, दक्षिण भारतातील 'ती' मोहीम केली फत्ते
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरची चिमुकली अन्वी घाटगे ही तिच्या धाडसी मोहिमांमुळे नेहमीच चर्चेत असते. साडेचार वर्षांच्या अन्वीने आता दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत.
एखादा गड किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांची दमछाक होत असते. मात्र कोल्हापूरची चिमुकली कन्या अन्वी घाटगे ही कित्येक डोंगर आणि किल्ले सर करणारी सर्वात छोटी गिर्यारोहक आहे. याआधी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या अन्वीने आता तामिळनाडू आणि केरळचे सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान मिळवला आहे. तिच्या आई वडिलांसह तिने ही मोहीम मराठी नववर्षाचा स्वागताच्या निमित्ताने आखली होती.
advertisement
advertisement
अन्वीच्या यशाचाच पुढचा टप्पा म्हणून गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ही केरळ आणि तामिळनाडूमधील मोहीम आखली होती. मोहिमेसोबतच "निसर्ग, पर्यावरण वाचवा. आरोग्यपुर्ण आयुष्य वाढवा", हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असे अन्वीची आई अनिता घाटगे यांनी सांगितले.
advertisement
7 एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेली ही मोहीम सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च असणारे मिसापुल्लीमला हे 8661 फुट उंच शिखर सर करण्यापासून झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तरीही अवघ्या 90 मिनिटांमध्ये हे शिखर अन्वीने सर केले असुन हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र केरळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुनारचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्जी मथचान, डिव्हीजनल मॅनेजर मिथुन मोहन यांनी दिले आहे.
advertisement
तसेच 9 एप्रिल रोजी मराठी नववर्षारंभानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व तमिळनाडु राज्यातील सर्वोच्च अरणारे दोडाबेट्टा हे 8652 फुट उंच शिखर अन्वीने 50 मिनिटांमध्ये सर केले. या दोडाबेट्टा शिखरावरुन तिने तमाम मराठी बांधवांना नविन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. तिच्या या मोहिमेत तमिळनाडू वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही तिच्यासोबत होते.
advertisement
दोडाबेट्टा शिखर सर्वात लहान वयात सर करणारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली. याबाबतचे प्रमाणपत्रही निलगिरी डिस्ट्रीक फॉरेस्ट ऑफिस तमिळनाडूचे डीएफओ गौतम यांनी दिली आहे. त्याचबरोबर या मोहिमे दरम्यान अन्वीने किल्ले हुलीहुर, श्रीरंगपट्टणम पोर्ट, किल्ले चित्रदुर्ग, किल्ले कित्तुर, किल्ले बेळगांवी, किल्ले लालबेथरी, किल्ले राजहंसगड, किल्ले वल्लभगड असे आठ किल्ले सर केलेले आहेत. अशी माहिती अन्वीची आई अनिता घाटगे यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
आजवर अन्वी घाटगे या चिमुकल्या मुलीने 6 सर्वोच्च शिखरासह 54 गडकिल्ले, 17 जंगल भ्रमंती केल्या आहेत. तर आतापर्यंत 150 हून अधिक मानसन्मान व पुरस्कार तिला प्राप्त झालेले आहेत. तसेच 2 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड, 3 वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, 2 वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही अन्वीच्या नावाची नोंद झालेली आहे.
advertisement







