कोल्हापुरात धरण, बंधारे पुन्हा ओव्हर फ्लो, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून कोल्हापूर शहरातील कळंबा तलाव देखील दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे.
1/7
यंदाचा ऑगस्ट महिना हा पावसाअभावी कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

advertisement
2/7
 गेल्या काही दिवसांपासून  परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
advertisement
3/7
धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे. दिनांक 10 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.

4/7
भोगावती नदीपात्रात धरणाच्या पॉवर हाऊस मधून 1400 क्युसेक्स आणि स्वयंचलित दरवाजातून सुरू झालेल्या 1428 क्युसेक्स अशा एकूण 2828 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

5/7
त्यामुळे कोल्हापुरातील शिंगणापूर आणि राजाराम यासह काही बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

6/7
तर गुरुवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे कोल्हापूर शहरातील कळंबा तलाव देखील दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

7/7
दरम्यान, धरण आणि तलाव पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता शहर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement