Pune Rain: पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्राला धोक्याचे, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील आजचे हवामान.
1/7
राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीप आहे तसेच विदर्भात मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.

advertisement
2/7
आज दिनांक 10 जून रोजी राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील आजचे हवामान.

3/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहिल. वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 30.7 अंशवर राहिले. तसेच 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात गडगडाटी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

5/7
साताऱ्यातील पारा 31.6 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 33.3 अंशावर राहिले. मागील 24 तासात 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात मात्र तापमानात वाढ होवून पारा 35 अंशावर जाण्याचा अंदाज आहे.आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

6/7
कोल्हापुरातील कमाल तापमान 30.6 अंशांवर राहिले आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 33 अंशावर स्थिर राहील. पुढील 24 तासात साधारणपणे ढगाळ आकाशासह एक दोनवेळा हलक्या पावसाची शक्यता आहे.

7/7
यंदा वेगाने प्रगती करत मे महिन्यात महाराष्ट्रात धडक देणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्याची वाटचाल जवळपास दोन आठवड्यांपासून थांबली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement