EVM बिघाड ते शाई गायब! महापालिका निवडणुकीत गोंधळच गोंधळ; मतदानावेळी कुठे, काय झाला घोळ?

Last Updated:
Municipal Election 2026 : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असतान बराच गोंधळ झाला. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आल्या. कुठे काय काय झालं ते पाहुयात.
1/9
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान सुरू झाल्यापासूनच गोंधळ सुरू झाला. कुठे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तर कुठे मतदानानंतर बोटांवर लावली जाणारी काही वेळातच गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मतदानावेळचा हा सगळा गोंधळ, कुठे कुठे काय काय झालं ते पाहुयात.

advertisement
2/9
पुण्यातील सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. मतदारांना आपलं मत नक्की कुणाला पडलं? याचा पत्ताच लागला नाही. मत नक्की कुणाला पडलं पाहण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी (VVPAT) यंत्र यावेळी मशीनसोबत जोडलेली नव्हती. आपली मते योग्य उमेदवारालाच गेली आहेत का, याची पडताळणी करता येत नसल्याने नागरिक संभ्रमात होते.

3/9
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे. अंकुश काकडे यांच्या म्हणण्यानुसार, मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच पेटली नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली की नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, संबंधित ईव्हीएम मशीनमध्ये वेळेचा मोठा फरक आढळून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये वेळ 7 वाजून 44 मिनिटे दाखवली जात होती, जी प्रत्यक्ष वेळेपेक्षा तब्बल 14 मिनिटांनी जास्त असल्याचा दावा अंकुश काकडे यांनी केला आहे.

4/9
मुंबईतील दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार विशाखा राऊत यांच्या नावासमोरील बटण दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचं ईव्हीएम बदलण्यात आले. या कारणाने येथील मतदान प्रक्रिया रखडली.

5/9
काही ठिकाणी राजकीय पक्षांकडे असलेल्या मतदारयादी आणि मतदान केंद्रात असलेल्या मतदारयादीत फरक असल्याने गोंधळाची स्थिती दिसून आली. काहींची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याची तक्रार दिसून आली होती.

6/9
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 146 प्रभागात लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदाराचं मतदाराचं नाव आता महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत नाही. ते गहाळ झाल्याचा दावा करत मतचोरी झाल्याचा आरोप तकण्यात आला आहे. काही ठिकाणी मतदारांची नावं सापडली नाहीत. त्यामुळे मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी वणवण फिरावं लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

7/9
पुण्यातल्या धायरी परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. इथं बाहेरून काही महिलांना आणून मतदान करून घेतलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय एका विशिष्ट लिक्विडचा वापर करून शाई देखील पुसली जात आहे. ही शाई पुसून पुन्हा या महिला मतदान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

8/9
मतदानाच्या शाईचा घोळ मुंबई, ठाणे ते पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळाला.  मतदानानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई यावेळी मार्कर पेनच्या स्वरूपात आहे. ही शाई पुसली जात असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

9/9
छत्रपती संभाजीनगमध्ये एक उमेदवार दोन वेगवेगळ्या पक्षाकडून आणि दोन वेगवेगळ्या प्रभागामधून निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हा गौप्यस्फोट केला आहे. एक उमेदवार एका वॉर्डमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. तर दुसऱ्या एका वॉर्डमधून वंचितकडून निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा उमेदवार नक्की कोण? असा सवाल उपस्थित झाला असून संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement