पाऊस थांबला, आता थंडीचा तडाखा, विदर्भाचा पारा घसरला!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विदर्भात थंडीचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांचे तुर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे.
advertisement
विदर्भात रविवारी सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. आज 4 नोव्हेंबरला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असणार, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे.
advertisement
advertisement
तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. थंडी आणि ढगाळ वातावरण यामुळे तूर पिकांत अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यांत आंतरपीक म्हणून तुरीचे पिकं घेतले जाते. त्या पिकाच्या नुकसानीस आता सुरवात झाली आहे.
advertisement










