Vidarbha Alert: एप्रिलअखेर नवं संकट, विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेचा पारा चढलेला असतानाच एप्रिलअखेर नवं संकट येणार आहे. हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याबरोबरच वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज 27 एप्रिलला विदर्भातील तापमान आणि हवामान कसे राहील? ते जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या हवामान बदलाचा थेट परिणाम विदर्भातील शेतीवर होण्याची शक्यता आहे. गहू, फळबाग यांसारख्या पिकांवर वादळी वाऱ्यांमुळे नुकसान होऊ शकते. तसेच गारपीटीमुळे पिकांची क्वालिटी घसरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास काढणी झालेली पिके सुरक्षित स्थळी ठेवावीत तसेच न कापलेली पिके तातडीने काढण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
advertisement
विदर्भात पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होणार असून, वातावरणात आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. यासोबतच काही भागांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


