Palghar News : 'दादा पुढे जाऊ नको..' पालघरमध्ये चिमुकल्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोघांचे जीव
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Palghar News : चिमुकल्यांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे जीव वाचल्याची घटना पालघरमध्ये समोर आली आहे. (राहुल पाटील, प्रतिनिधी)
advertisement
पालघरच्या लोकमान्य नगर येथील वसंत विहार बिल्डिंगच्या समोर विजेच्या खांबावरील पाचपैकी एक विद्युत वाहिनी तुटून पडली असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, विद्युत वाहिनी तुटताना जोराने झालेल्या आवाजामुळे समोरच्या ऋषभ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्विम भंडारे वय(12) आणि त्याची लहान बहीण संस्कृती भंडारे (8) यांनी अपार्टमेंटच्या गॅलरीत धाव घेतली.
advertisement
advertisement
advertisement