भाजपच्या माजी आमदाराचे हटके आंदोलन, थेट जिल्हा परिषद कार्यालयात अंथरून टाकून झोपले, Photos
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगडच्या जिल्हा परिषद कार्यालयात हटके आंदोलन केले आहे.थेट जिल्हा परिषद कार्यलयात अंथरून टाकून झोपून आंदोलन केले आहे.
माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगडच्या जिल्हा परिषद कार्यालयात हटके आंदोलन केले आहे.थेट जिल्हा परिषद कार्यलयात अंथरून टाकून झोपून आंदोलन केले आहे.
advertisement
श्रीवर्धन मधून कर्जत येथे बदली झालेल्या सात शिक्षकांना तातडीने बदली झालेल्या झाळांमध्ये रूजू होण्यास सांगावे या मागणीसाठी हे आंदोलन केले होते.
advertisement
जोवर शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितले जाणार नाही तोवर कार्यालयातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
advertisement
खरं तर मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून तोंडी आदेश असल्याने म्हसळा,श्रीवर्धन आणि तळा येथील शिक्षकांना सोडता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले होते.
advertisement
या घटनेमुळे संतापलेल्या सुरेश लाड यांनी थेट रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनात झोपून आंदोलन केले.
advertisement