Vande Bharat Express: पुणे- नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचं तिकिट किती? ट्रेन कुठे कुठे थांबणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
2025 या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रातील पुणे–नांदेड मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे तसेच नांदेडमधील रहिवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. सध्या पुणे–नांदेड प्रवास पूर्ण करण्यास जास्त वेळ लागतो, पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा 550 किमीचा प्रवास फक्त 7 तासांत संपणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंत्रालयाकडून गाडीचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पुणे–नांदेड प्रवास फक्त वेळेची बचत नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील एकात्मिक विकासाला देखील चालना मिळेल. कृषी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये याचा फायदा होईल.


