आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, 24 तास महत्त्वाचे, पुणे, साताऱ्याला हायअलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर आज आस्मानी संकट घोंघावत असून पुणे आणि सातारा जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अलर्ट दिला आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल झाले असून आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे साताऱ्याला ऑरेंज तर सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
पुणे जिल्ह्यात देखील आज आस्मानी संकटाचा धोका असणार आहे. आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम असून मागील मंगळवारी 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्याचा पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 37.9 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल. एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यासाठी सतर्कतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
advertisement








