पतीचं निधन झालं, सासूने दिली साथ, शेतकऱ्याच्या सूनेनं तुकड्याभर जमिनीतून 1 लाख कमावले
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
धाराशिव येथील प्रियांका बोबडे यांना पती निधनानंतर सासूने साथ दिली आणि महिला शेतकरी लखपती झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रियांका यांनी सेंद्रिय पद्धतीने मिरचीचे उत्पन्न घेतले. शेडनेटमध्ये मिरचीची लागवड केल्याने फवारणीचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांना फक्त 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च आलाय. तर कमीत कमी पाण्यात भरघोस उत्पन्न मिळतेय. मिरचीला बाजारात 40 रुपये किलोहून अधिकचा दर मिळतोय. त्यामुळे त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचेही प्रियांका यांनी सांगितले.
advertisement
advertisement
यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या योजनेतू शेडनेट हाऊस साठी मदत घेतली. शेडनेट हाऊस उभारून त्यामध्ये त्या यशस्वी शेती करतात. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आणि पॉलिहाऊस यामुळे कमीत कमी पाण्यात, कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी फवारणीत जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल करायला हवेत, असेही प्रियंका बोडके सांगतात.


