19300500 रुपयांचं सोनं, पैसे मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, मशीनं तापले पण नोटा संपेना, कुठे सापडलं घबाड

Last Updated:
सीबीआयने डीआयजी हरचरण सिंह भुल्लर आणि दलाल कृष्णू यांना ८ लाख लाच घेताना अटक केली; छाप्यात ५ कोटी रोकड, १.५ किलो सोने, महागडी घड्याळे आणि शस्त्रास्त्रे जप्त.
1/8
अधिकाऱ्यांना नोटा पाहूनच घाम फुटला, मोजपर्यंत मशीन गरम झाल्या, तरी नोटा काही केल्या संपेना, इतका ऐवज पाहून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे डोळेच विस्फारले होते. एक एक बॅग उघडल्यानंतर त्यातून कपडे नाही तर 500 रुपयांच्या पैशांचं बंडल सापडत होते. एक दोन नाही अशा अनेक बॅगा कर्मचाऱ्यांना उघडून समोर ठेवल्या. ते पाहूनच घाम फुटला, इतकी रक्कम मोजणं मोठा टास्कच होता.

advertisement
2/8
नोटा मोजून मशीन गरम झालं, तर दागिन्यांच्या किंमतीची टॅली करता करता बोबडी वळायची वेळ आली. केंद्रीय तपास यंत्रणा ने पंजाब पोलिसांच्या रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या एका प्रकरणात गुरुवारी अटक केली. त्यांच्या घरावरील छापेमारी दरम्यान पाच कोटींची रक्कम दीड किलो सोनं आणि महागडी घड्याळं यासोबत अनेक ऐवज जप्त करण्यात आला.

3/8
फत्तेहगढ साहिब येथील मंडी गोबिंदगढ येथील एका भंगार व्यावसायिकाकडून डीआयजी भुल्लर यांनी एका दलालामार्फत ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २०१७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डीआयजी भुल्लर यांचे वडील महल सिंह भुल्लर हे देखील पंजाबचे डीजीपी राहिलेले आहेत.

4/8
सीबीआयने सापळा रचून डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना चंदीगडच्या सेक्टर-२१ मधून ८ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत डीआयजी भुल्लर यांच्यासोबत दलाल कृष्णू यालाही अटक करण्यात आली आहे. या भंगार व्यावसायिकावर दाखल असलेल्या एफआयआरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी डीआयजी भुल्लर हे दलाल कृष्णूकरवी दर महिन्याला 'मंथली' वसुली करायचे.

5/8
डीआयजी भुल्लर आणि दलाल कृष्णू यांना शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, जिथे सीबीआय त्यांच्या रिमांडची मागणी करत आहे. लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआय चंदीगडच्या ८ टीम्सनी गुरुवारी अंबाला, मोहाली, चंदीगड आणि रोपडसह ७ ठिकाणांवर छापे टाकले.

6/8
डीआयजी भुल्लर यांचे कार्यालय, निवासस्थान, फार्म हाऊस आणि इतर मालमत्ता सीबीआयने पिंजून काढल्या. मोहाली येथील कॉम्प्लेक्स ऑफिस आणि चंदीगडच्या सेक्टर-४० मधील त्यांच्या निवासस्थानी दिवसभर सीबीआयची कसून चौकशी सुरू होती. दलाल कृष्णू याच्या घरी छापा टाकून सीबीआयने २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

7/8
डीआयजीच्या घरात काय सापडलेल्या वस्तू- ५ कोटी रुपयांची रोकड, १.५ किलो सोने आणि इतर मौल्यवान दागिने, पंजाब आणि चंदीगडमधील अचल संपत्तीची (Immovable Property) कागदपत्रे. मर्सिडीज आणि ऑडी यांसारख्या आलिशान गाड्यांच्या चाव्या. २२ महागडी आणि अनमोल घड्याळे. लॉकरच्या चाव्या आणि ४० लिटर विदेशी दारू याशिवाय शस्त्रास्त्रे: एक डबल बॅरल गन, एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, एक एरगन आणि गोळ्या.

8/8
सीबीआयने कसून चौकशी केल्यानंतर डीआयजी भुल्लर आणि दलाल कृष्णू या दोघांनीही लाच घेतल्याची कबुली दिली आहे. डीआयजी भुल्लर यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी छापा टाकल्यावर सीबीआयला कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे, मोठी रोकड, सोने आणि दागिने सापडले. ही रोकड मोजण्यासाठी सीबीआयला अनेक मोजणी यंत्रे मागवावी लागली. या कारवाईने पंजाब पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement