'हमारे भाभी का बेटा..', जिम ट्रेनर हिंदू मुलींना फसवतायत, गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले!

Last Updated:

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जिम ट्रेनरकडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचं वक्तव्य पडळकरांनी केलं.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जिम ट्रेनरकडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचं वक्तव्य पडळकरांनी केलं. हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, त्यांनी घरातच योगा करावा, जिममध्ये जायची गरज नाही, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीडमध्ये नुकतीच ओबीसी जनआक्रोश मोर्चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमातून पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत याच समुदायाची मुलं जिम ट्रेनर असतात असं सांगण्याचा प्रयत्न केला.

गोपीचंद पडळकर नक्की काय म्हणाले?

राज्यातील कथित जिममधील लव्ह जिहादवर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "हे षडयंत्र नीट समजून घ्या. हमारे भाभी का बेटा बहुत अच्छा है. अच्छा बोलता है... वो वैसा नही है... जैसा हिंदू के लिए काम करनेवाले लोग बोलते है... पण असं काही नाही. जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे, ते बघा... आपल्या तरुण मुली जिममध्ये जात असतील, तर त्यांना समजावून सांगा. घरात योगा करा. तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही. ते फसवतायत, ते तुमच्यावर अन्याय करतायत."
advertisement
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले पाहिजे. "यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे," असे देखील त्यांनी म्हटले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हमारे भाभी का बेटा..', जिम ट्रेनर हिंदू मुलींना फसवतायत, गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement