धोक्याची घंटा! भारतात तब्बल 80 टक्क्यांहून अधिक मनोरुग्ण उपचारांपासून वंचित, काय घडतंय? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mental Health: संबंधित व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नसून आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. अलीकडेच इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजारांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डिप्रेशन, अॅनझायटी, अतिचिंता, ओव्हरथिंकिंग यांसारख्या मानसिक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. मात्र, मानसिक आजारांबाबत समाजात असलेल्या भीती आणि संकोचामुळे अनेक जण आपली समस्या उघडपणे मांडत नाहीत. यामुळे संबंधित व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नसून आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. अलीकडेच इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. भारतातील सुमारे 80 टक्के मानसिक आजारांच्या रुग्णांना वेळेवर किंवा योग्य उपचार मिळत नाहीत. याविषयी मानसोपचार तज्ज्ञ निकिता जगताप यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
निकिता जगताप यांनी सांगितलं की, राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण आणि तज्ज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नैराश्य, चिंता विकार, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया यांसारख्या मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले कोट्यवधी नागरिक उपचारांपासून दूर आहेत. अनेक रुग्णांना आपला आजार वेळेवर ओळखता येत नाही. त्यामुळे ते अनेक वर्षे निदान न होता जगत राहतात आणि आजार हळूहळू बळावतो.
advertisement
सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, किशोरवयातील मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या जवळपास 80 टक्के मुला-मुलींना कोणतेही नियमित मानसिक आरोग्य उपचार मिळत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही स्थिती अधिक गंभीर असून, 84 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती उपचार व्यवस्थेपासून दूर आहेत. या उपचारांच्या अभावाचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणातील प्रगती, रोजगाराच्या संधी, कौटुंबिक नातेसंबंध तसेच एकूण सामाजिक जीवनावर होत आहे.
advertisement
मानसिक आजार वाढण्यामागील कारणे कोणती?
दैनंदिन जीवनातील ताणतणाव, वाढती स्पर्धा आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या ही मानसिक आजार वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर पुरेशी झोप न घेणे, योग्य आहार न करणे तसेच मनातील दुःख व भावना कोणासमोरही व्यक्त न करणे यामुळेही मानसिक समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे निकिता जगताप यांनी सांगितले.
मानसिक आजारांवर उपाय काय?
मानसिक आजारांची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबत पुरेशी झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. मानसिक आजारामध्ये लाज बाळगू नका आपल्या स्थितीची माहिती डॉक्टरांना द्या आणि योग्य ते उपचार घ्या. मानसिक आजारांविषयी जनजागृती करणे देखील गरजेचे आहे, असे निकिता यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 10:55 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
धोक्याची घंटा! भारतात तब्बल 80 टक्क्यांहून अधिक मनोरुग्ण उपचारांपासून वंचित, काय घडतंय? Video








