advertisement

Mumbai Local : लोकल अपघातांच्या तपासातील मिसिंग लिंक आता सापडणार; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Mumbai Local Train : लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. अपघात, आत्महत्या आणि रुळांवरील अडथळ्यांचे नेमके कारण समजण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख जगभर झालेली आहे. मात्र गेल्या काही वर्षात लोकलमध्ये वादविवाद आणि त्यावर मोठ-मोठे गुन्हेही घडताना दिसत आहेत. सध्या एका लोकलमधील घटनेने सर्वजण हादरले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा मुख्य फायदा हा लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनसमोर घडणाऱ्या अपघातांची नेमकी कारणे समजावीत यासाठी आहे. मोटरमन केबिनच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात करण्यात आली असून यामुळे अपघातांचे योग्य माहिती मिळणे शक्य होणार आहे.
प्रत्येक हालचाल आता कॅमेऱ्यात होणार कैद
मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एकूण 161 लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात आले आहेत. बाकी लोकल गाड्यांमध्येही हे कॅमेरे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच सर्व लोकल गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मोटरमन केबिनबाहेरील सीसीटीव्ही प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. त्यातून हा निर्णय समोर आला आहे.
advertisement
अनेक लोकल मार्गावरील घटना
सध्या रेल्वे रुळांवर होणाऱ्या आत्महत्या, रुळांवरील अडथळे किंवा लोकलचा समोरून होणारा अपघात यांची चौकशी करताना मोटरमनचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब हेच मुख्य पुरावे असतात. मात्र अनेक वेळा या जबाबांमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे अपघाताचे खरे कारण ठरवणे कठीण होते.
यामुळे सीसीटीव्ही बसवणे गरजेचे ठरले
ही समस्या दूर करण्यासाठी मोटरमन केबिनबाहेर रेल्वे रुळ आणि आजूबाजूचा परिसर कव्हर करणारे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने अपघातांचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध होईल ज्यामुळे चौकशी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : लोकल अपघातांच्या तपासातील मिसिंग लिंक आता सापडणार; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold Price : सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट
सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणत
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली आहे

  • सोनं-चांदीच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे.

  • आता सोनं खरेदी करावं की थोडं थांबावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

View All
advertisement