advertisement

Pandharpur Accident : विठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पंढरपूरजवळ भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू

Last Updated:

Pandharpur Accident News : "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" असा जयघोष करत निघालेल्या या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला, ज्यामुळे आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर एका भीषण दुर्घटनेत झालं.

Pandharpur Accident News
Pandharpur Accident News
Pandharpur Accident News : विठुरायाचे दर्शन घेऊन अत्यंत समाधानाने घराकडे निघालेल्या भाविकांच्या प्रवासाचा अंत रक्ताने माखलेल्या रस्त्यावर झाला. पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील शरदनगर येथे झालेल्या एका भीषण अपघातामुळे पूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" असा जयघोष करत निघालेल्या या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला, ज्यामुळे आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर एका भीषण दुर्घटनेत झालं.
ठाणे आणि डोंबिवली परिसरातील भाविक देवदर्शनासाठी क्रूझर गाडीने निघाले होते. अक्कलकोट आणि गाणगापूर येथील दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. मात्र, मंगळवेढा मार्गावरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या क्रूझरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरच्या ड्रायव्हर बाजूचा पूर्ण हिस्सा अक्षरशः चिरडला गेला असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
या दुर्दैवी घटनेत एका लहान मुलासह 3 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतरचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता, जिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले भाविक आणि जखमींचा आक्रोश पाहून मदतीला धावलेल्या लोकांचेही डोळे पाणावले. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
सध्या 8 भाविक मृत्यूशी झुंज देत असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. मृत भाविक हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी असल्याने त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून 5 ते 6 जणांची प्रकृती अजूनही अत्यंत नाजूक आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. देवदर्शनाच्या समाधानाचे रूपांतर क्षणात मृत्यूच्या छायेत होईल, अशी कोणाही कल्पना केली नव्हती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Pandharpur Accident : विठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पंढरपूरजवळ भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू
Next Article
advertisement
Gold Price : सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट
सोनं १६०००० रुपयांच्या पार! आता खरेदी करणं शहाणपणाचं की ठरेल घाई? पाहा काय म्हणत
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली आहे

  • सोनं-चांदीच्या दराने ऑलटाइम हाय गाठला आहे.

  • आता सोनं खरेदी करावं की थोडं थांबावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

View All
advertisement