Credit Card: Alert! या 7 ठिकाणी कधीच वापरू नका क्रेडिट कार्ड, छोटी चूक करेल मोठं नुकसान
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
क्रेडिट कार्ड असलं म्हणून काय झालं, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी खर्च केलाच पाहिजे असं काही नाही, बऱ्याचदा आपण ऑनलाईन शॉपिंगच्या नादात क्रेडिट कार्डचे डिटेल्स अगदी सहज वेबसाईटला देऊन टाकतो किंवा पटकन कुठेही स्वाइप करतो. मात्र हीच चूक तुम्हाला महागात पडू शकते. या चुकांमुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. या चुका टाळण्यासाठी आणि तुमचं बँक अकाउंट सुरक्षित करण्यासाठी काय टिप्स आहेत जाणून घ्या.
तुमची एकूण क्रेडिट लिमिट जर ५ लाख असेल आणि तुम्ही आधीच ४.५ लाख खर्च केले असतील, तर प्रथम जुनी थकबाकीभरा. अशा वेळी नवीन व्यवहार केल्यास तुमचे क्रेडिट यूटिलायझेशन रेशो ९०% पर्यंत वाढेल, जो CIBIL स्कोअरसाठी अत्यंत वाईट मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, हा रेशो ३०% पेक्षा कमी असावा. तुम्ही वारंवार लिमिटच्या जवळ खर्च केल्यास, तुमचा CIBIL स्कोअर घसरू शकतो आणि भविष्यात कर्ज मिळण्यास किंवा कार्डची लिमिट वाढवण्यात अडचण येऊ शकते.
advertisement
ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर कधीही करू नका. कारण, असं केल्यानं तुम्हाला २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत जास्तीचे चार्ज भरावे लागू शकतात. यासोबतच, कोणत्याही ग्रेस पीरियडशिवाय पहिल्या दिवसापासूनच रोजचा इंटरेस्ट रेट लागू होते. याचा अर्थ, तुम्ही १०,००० काढल्यास, एका महिन्यात व्याजासहित ती रक्कम १०,४०० किंवा त्याहून अधिक होऊ शकते.
advertisement
तुमच्याकडे क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतील, तर क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळा. अनेक लोक फक्त Minimum Due रक्कम भरून तात्पुरती सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे केवळ व्याज वाढत जाते. उदाहरणार्थ, जर तुमचे बिल ५०,००० असेल आणि तुम्ही फक्त ५,००० भरले, तर उर्वरित ४५,००० रुपये वर दररोज व्याज लागू होत राहील. यामुळे तुमचे कर्ज वाढत जाईल आणि व्याजाचा मोठा भार तुमच्या खिशावर पडेल.
advertisement
जर तुम्ही केवळ क्रेडिट कार्डच्या भरवशावर एखादा महागडा गॅझेट किंवा प्रवासाचे पॅकेज खरेदी करत असाल आणि तुमच्याकडे परतफेड करण्याची कोणतीही ठोस योजना नसेल, तर हे पाऊल तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते. तज्ज्ञांच्या मते, मोठी खरेदी तेव्हाच करा, जेव्हा तुमच्याकडे ते पैसे फेडण्यासाठी आर्थिक बॅकअप किंवा हप्त्यांमध्ये (Installments) भरण्याची योजना उपलब्ध असेल.
advertisement
advertisement
जर तुम्हाला दर महिन्याला ड्यू डेटनंतर बिल भरण्याची सवय असेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःच्या क्रेडिट स्कोअरचे नुकसान करत आहात, हे समजून घ्या. प्रत्येक उशिरा भरलेल्या बिलावर बँक विलंब शुल्क, इंटरेस्ट चार्ज आणि CIBIL रिपोर्टवर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे, ऑटो-डेबिट सेट करा किंवा रिमाइंडर लावून वेळेवर पेमेंट करा.
advertisement


