7.5 कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! 5 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे. आता तातडीच्या आर्थिक गरजांसाठी पीएफ काढणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7.5 कोटी सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पीएफ ऑटो-सेटलमेंटच्या मर्यादेत मोठा बदल करत ती 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा कर्मचारी वर्गाला होणार आहे, कारण यामुळे आता पीएफ दाव्याचा निपटारा केवळ 3-4 दिवसांत होऊ शकतो. यापूर्वी, हा कालावधी सुमारे 10 दिवसांचा होता.
advertisement
advertisement
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली 28 मार्च रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 113 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. EPFOच्या CBT कडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे कर्मचारी वर्गासाठी मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या आर्थिक गरजा अधिक सोप्या पद्धतीने पूर्ण होतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


