PF वर सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट, UPI मधून थेट पैसे काढण्याची तारीख जाहीर; असे असतील नवे नियम

Last Updated:
PF Withdraw: EPFO एप्रिल 2026 पासून मोठा डिजिटल बदल आणत असून, कर्मचाऱ्यांना UPI च्या माध्यमातून थेट ईपीएफमधील पैसे बँक खात्यात काढण्याची सुविधा मिळणार आहे. क्लेम प्रक्रिया, विलंब आणि कागदोपत्री झंझट संपवणारा हा निर्णय कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
1/7
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डिजिटल सुविधांचा विस्तार करत EPFO एप्रिल 2026 पासून एक महत्त्वाचा अपडेट लागू करणार असून, यामुळे कर्मचारी आपल्या ईपीएफ खात्यातील रक्कम थेट UPI च्या माध्यमातून बँक खात्यात ट्रान्सफर करू शकणार आहेत. या नव्या सुविधेमुळे ईपीएफमधील पैसे काढण्यासाठी क्लेम फाइल करण्याची गरजच उरणार नाही आणि प्रक्रिया पूर्णपणे सोपी, जलद होणार आहे.

advertisement
2/7
कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन EPFO हा मोठा डिजिटल बदल करत आहे. आतापर्यंत ईपीएफमधील पैसे काढण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन क्लेम प्रक्रिया करावी लागत होती, ज्याला काही दिवसांचा कालावधी लागत असे. मात्र नव्या अपडेटनंतर EPF सदस्य आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यामधून थेट UPI च्या साहाय्याने ईपीएफमधील उपलब्ध रक्कम पाहू शकतील. UPI पिन टाकून व्यवहार पूर्ण केल्यानंतर पैसे त्वरित बँक खात्यात जमा होतील.

3/7
PTIने दिलेल्या वृत्तानुसार हा डिजिटल अपडेट एप्रिल 2026 पासून लागू होणार असून, कामगार मंत्रालय यासाठी सातत्याने तांत्रिक तयारी करत आहे. या नव्या प्रणालीमध्ये ईपीएफ बॅलन्सचा एक भाग ‘फ्रीज’ ठेवला जाणार आहे. तर उर्वरित रक्कम सदस्यांसाठी वापरासाठी खुली असेल. यामुळे निवृत्ती सुरक्षिततेला धक्का न लागता गरज पडल्यास तात्काळ निधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

4/7
एकदा ईपीएफमधील रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर कर्मचारी त्या पैशांचा वापर डिजिटल पेमेंटसाठी करू शकतील किंवा एटीएममधून रोख रक्कम काढू शकतील. EPFO च्या मते ही संपूर्ण प्रणाली अत्यंत सुरक्षित असेल. सध्या EPFO च्या सॉफ्टवेअरमधील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असून, त्या पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.

5/7
कोविड-19 नंतर EPFO ने ऑनलाइन सेटलमेंट प्रक्रिया सुरू केली होती. मात्र तरीही ईपीएफ काढण्यासाठी क्लेम फाइल करावा लागत असून, त्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो. आता ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी क्लेम मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आधी 1 लाखांपर्यंत असलेली मर्यादा आता 5 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे.

6/7
याशिवाय ऑक्टोबर 2025 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) ने ईपीएफमधून आंशिक रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल मंजूर केले होते. त्यानुसार 13 वेगवेगळ्या कारणांना तीन प्रमुख कॅटेगरीमध्ये विभागण्यात आले आहे. आवश्यक गरजा (आजार, शिक्षण, लग्न), गृहनिर्माण गरजा आणि विशेष परिस्थिती. या नियमांनुसार सदस्यांना आपल्या ईपीएफ बॅलन्समधील मोठा भाग काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

7/7
निवृत्ती सुरक्षिततेचा विचार करता, सदस्यांना किमान 25 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात कायम ठेवणे बंधनकारक असेल. या शिल्लक रकमेवर कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेले सुमारे 8.25 टक्के वार्षिक व्याज मिळत राहणार आहे. त्यामुळे तात्काळ गरजा भागवतानाच दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितताही कायम राहणार आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement