SBI किंवा PNB नाही, तर या सरकारी बँक FD वर देताय सर्वाधिक व्याज, चेक करा लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Fixed Deposits :भारतीय लोक फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD मध्ये भरपूर पैसे गुंतवतात. रिटर्नची गॅरंटी आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे लोक एफडीला प्राधान्य देतात. FD बद्दल अजून एक खास गोष्ट आहे. भारतात, लोक मोठ्या बँकांमध्ये जास्त एफडी करतात, तर लहान बँका जास्त व्याज देतात. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी बँकांबद्दल सांगणार आहोत, जे तीन वर्षांच्या कार्यकाळातील एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
advertisement
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडी ठेवींमध्ये बँक ऑफ बडोदाचा हिस्सा 6 टक्के आहे. सरकारी बँकांच्या एकूण एफडीमध्ये बँक ऑफ बडोदाचा वाटा 10 टक्के आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









