ओटीपी न देता, लिंक न शेअर करता खात्यातून गायब झाले साडेचार लाख रुपये
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोवंडीतील व्यापारी मोहम्मद अमरराज अन्वर कुरेशी यांच्या खात्यातून कोणतीही लिंक किंवा ओटीपी न देता साडेचार लाख रुपये गायब झाले, नेहरू नगर पोलिस तपास करत आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, या व्यापाऱ्याने ना कोणतीही लिंक शेअर केली होती, ना ओटीपी दिला होता. तरीदेखील त्यांचं खातं रिकामं झालं. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणारे व्यापारी मोहम्मद अमरराज अन्वर कुरेशी १५ ऑगस्ट रोजी कामानिमित्त आपल्या मूळगावी गेले होते. त्यांचा मोबाईल त्या काळात बंदच होता.
advertisement
जवळपास महिन्यानंतर, २२ सप्टेंबर रोजी ते परत आले आणि मोबाईल सुरू करताच बँकेकडून आलेले मेसेज पाहून ते थक्क झाले. त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे त्यांना मेसेज येत होते.एकूण 5 लाख 6 हजार 580 रुपये त्यांच्या खात्यातून काढले होते. या प्रकरणानंतर कुरेशी यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. बँकेच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक नियंत्रण विभागात त्यांनी तक्रार दाखल केली.
advertisement
advertisement
advertisement